Dowry Case: मुली झाल्या म्हणून हुंड्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज : दोन मुली झाल्या म्हणून तसेच माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला.(Dowry Case)हा प्रकार सन 2020 ते 23 ऑगस्ट 2022 या कालावधीत भोसरी आणि सावरगाव, ता. देवणी, जि. लातूर येथे घडला.

पती रवींद्र यादव जांभुळकर (वय 35), सुनील बाबुराव गायकवाड, धनाजी केरूरकर, दर्शन धनाजी केरूरकर, दर्पण धनाजी केरूरकर, सुग्रीव भिवराव सूर्यवंशी आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News : ग्राहक महिलेशी दुकानदाराचे गैरवर्तन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीला माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. घरगुती कारणांवरून तसेच फिर्यादीला दोन मुली झाल्यावरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांना आरोपींनी उपाशी ठेवले.(Dowry Case) पतीने त्याच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून विवाहितेला मारहाण करून त्रास दिला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.