Crime News : ग्राहक महिलेशी दुकानदाराचे गैरवर्तन

एमपीसी न्यूज – घड्याळ दुरुस्तीसाठी गेलेल्या महिलेशी गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवारी (दि.17) सायंकाळी डांगे चौक येथील एका घड्याळाच्या दुकानात घडली.

याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार दोन महिलांसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती डांगे चौकातील एका घड्याळाच्या दुकानात घड्याळ दुरुस्तीसाठी गेले. घड्याळ दुरुस्त करून देतो. मात्र त्याचे बिल आणि वॉरंटी, गॅरंटी मिळणार नसल्याचे आरोपी दुकानदाराने सांगितले.तसेच फिर्यादीचे घड्याळ फेकून दिले.त्यामुळे फिर्यादी यांनी दुकानाचा फोटो काढला आणि त्या पुढील खरेदीसाठी गेल्या.दुस-या दुकानात फिर्यादी खरेदी करत असताना आरोपी तिथे आले.त्यांनी फिर्यादीस त्यांच्या मोबाईलमधील फोटो डिलीट करण्याची धमकी देत पोलिसात गेल्यास बघून घेईन.पोलिसात तक्रार केली तर पोलीस माझे काहीही करू शकत नाहीत, अशी धमकी दिली.

आरोपींनी फिर्यादींसोबत गैरवर्तन केले.त्यांचे पती पाकीट काढत असताना त्यांचे पाकीट हिसकावण्याचा आरोपींनी प्रयत्न केला.फिर्यादीला दुकानाच्या काउंटवर पाडले,यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.