Crime News : भाजी खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – भाजी खरेदीसाठी आठवडे बाजारात गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन चोरटयांनी चोरून नेला.ही घटना शुक्रवारी (दि.19) सायंकाळी आदर्शनगर कॉर्नर, रावेत येथील आठवडे बाजारात घडली.

धनंजय गुलाबराव सोनवणे (वय 45, रा. रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास आदर्शनगर कॉर्नर येथील आठवडे बाजारात भाजी खरेदीसाठी गेले होते.भाजी खरेदी करत असताना चोरट्याने नकळत त्यांचा 60 हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला.रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.