Pimpri Crime: दहीहंडीच्या वर्गणीसाठी मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसा न्यूज : दहीहंडीची वर्गणी न दिल्याच्या रागातून चार जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 21) रात्री संत तुकाराम नगर,(Pimpri Crime) पिंपरी येथे घडली.

पवन शिवराज नुदनुरे (वय 21, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश पाटील आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : वाकड येथून वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या दहीहंडी उत्सवासाठी फिर्यादीकडे दहा हजार रुपये वर्गणी मागितली होती. ती वर्गणी फिर्यादी यांनी दिली नाही.(Pimpri Crime) त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यावरून आरोपींनी फिर्यादी पवन आणि त्यांचे मामा राजू देशमुख यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.या घटनेचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.