Bharati Vidyapeeth : अंधश्रद्धेपोटी महिलेला अघोरी कृत्य करायला लावणाऱ्या मांत्रिकाच्या आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज- अंधश्रद्धपोटी विवाहित महिलेला अघोरी (Bharati Vidyapeeth) कृत्य करायला लावणाऱ्या मांत्रिकाच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे

मौलाना बाबा जामदार असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 ऑगस्ट रोजी पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार मे 2013 पासून म्हणजे विवाहानंतर प्रांपचिक कारणावरून त्रास देण्यास सासरच्यांनी सुरुवात केली. सासरच्यांनी तिला मिळालेले तब्बल 1 कोटी सोन्या-चांदीचे दागिने, हिरे हे स्वतःकडे ठऊन घेतले. पुढे व्यवसायासाठी म्हणून 2 कोटी पिडितेच्या वडिलांकडून घेतले. पिडीतेला मुल व्हावे व घरात सुखशांती नांदावी म्हणून आरोपी मौलाना बाबा जमादार याच्या सांगण्यावरून त्याच्या समोर बसवून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले.

Crime News : वाकड येथून वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

यावरून भारती विद्यापीठ पोलीस तपास घेत असताना मौलाना हा कोल्हापूरचा रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर येथे जात त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. याचा पुढील तपास (Bharati Vidyapeeth) वरीष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.