Pune : पौडफाटा येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीमधील स्टोर रूमला आग

एमपीसी न्यूज- पौड फाटा येथे एसएनडीटी पुलाजवळ बांधकाम साइटवरील स्टोअर रूमला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागून यामध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य जाळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पौड फाटा येथे एसएनडीटी पुलाजवळ एका बांधकाम साइटवरील स्टोअर रूमला आग लागली. घटनेची माहिती मिळताच कोथरूड, एरंडवणा, कसबा पेठ आणि भवानी पेठ अग्निशमन केंद्रातून तीन फायर गाड्या आणि दोन टँकर दाखल झाले.

या आगीमध्ये स्टार रूममध्ये ठेवलेले पीवीसी पाइप, सुरक्षा जाळी, इलेक्ट्रिक पॅनल, रबर मॅट आदी साहित्य जाळून खाक झाले. या आगीमुळे परिसरात धूर पसरला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अशी माहिती सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड यांनी दिली. त्यांच्या समवेत स्टेशन ड्युटी ऑफिसर गजानन पाथरूडकर तसेच दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.