Vanawadi fire news : वानवडी लागलेल्या भीषण आगीत चार ते पाच घरे जळाली

एमपीसी न्युज: पुण्यातील वानवडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चार ते पाच घरे जळून भस्मसात झाली. वानवडी परिसरातील शिवरकर चाळीत ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिवरकर चाळ परिसरात एका मांडवाचे साहित्य ठेवलेल्या खोलीत अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आग लागल्यानंतर खोलीत असणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग सर्वत्र पसरली.

या भागात घरांची दाटीवाटी असल्याने ही आग आजूबाजुच्या घरांमध्ये पसरली. रात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक झोपेत होते. मात्र लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले. घरातील सिलिंडरही बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र काही घरे या आगीत भस्मसात झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.