Charholi : दुकानात जाऊन विनाकारण दुकानदारास मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानात जाऊन विनाकारण दुकानदारास मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दाभाडे वस्ती, चऱ्होली (Charholi) येथे घडला.

Sangvi : आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत व्यावसायिकाला सव्वा पाच लाखांचा गंडा

बेलाराम पटेल (वय 36, रा. दाभाडे वस्ती, चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय डोंगरे आणि त्यासोबतच एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल यांचे दाभाडे वस्ती येथे किराणा  दुकान आहे. फिर्यादी मंगळवारी सायंकाळी त्यांच्या दुकानात असताना आरोपी दुकानात आले. त्यांनी दुकानातील फ्रिजवर ठेवलेला स्पीकर उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारला. यात फिर्यादी जखमी झाले आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.