Dighi: दिघी येथे एकाकडून कोयता, एअर पिस्टल व चाकू जप्त

एमपीसी न्यूज –  दिघी येथील माधवनगर परिसरात एका 38 वर्षीय  (Dighi)तरुणाकडून पोलिसांनी एअर पिस्टल, कोयता व चाकू अशी हत्यारे जप्त केली आहेत. ही कारवाई दिघी पोलिसांनी बुधवारी (दि.17) सकाळी आठच्या सुमारास केली.

या प्रकरणात संतोष धनाजी गोंदके (वय 38 रा.दिघी) याला अटक (Dighi)केली आहे. दिघी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई वैभव काकडे यांनी फिर्याद दिली आहे.

 

Rahatani: हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची अॅसिड पिऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यात बेकायदेशीरपणे कोयता, एअर पिस्टल व स्टीलचा चाकू बाळगून होता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत चाकू, कोयता, पिस्टल व पितळी जॉब असा एकूण 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीवर दिघी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तो ही शस्त्रे का बाळगून होता याचा तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.