Talegaon Dabhade: पैसे दिले नाही म्हणून व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने मारहाण

तळेगावात हाणामारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ

एमपीसी न्यूज – पैसे मागितले असता दिले नाहीत या रागातून तिघांनी एका व्यावसायिकाला (Talegaon Dabhade) लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी (दि.12) घडली. 

 

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.17) आकाश संजय दाभाडे (वय 27 रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून हरिश गरड (वय 36 रा.तळेगाव दाभाडे), संतोष दिलीप भेगडे (वय 36 रा.तळेगाव दाभाडे) आणि प्रशांत प्रकाश गराडे (वय 32 रा.तळेगाव दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade :  तळेगाव दाभाडे परिसरातून चोरीला गेलेल्या 19 दुचाकीसह आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (आकाश संजय दाभाडे) व आरोपी (संतोष दिलीप भेगडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.संतोष यांनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली होती परंतू फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या साथीदारांसह फिर्यादीला  लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.