Rahatani: हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची अॅसिड पिऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज –  माहेरून हुंडा व गाडीसाठी आठ ते दहा लाख आण (Rahatani)म्हणत विवाहितेचा छळ होतहोता. सासरच्यांच्या या छळाला कंटाळून  विवाहितेने  बाथरुम मधील अॅसिड पिऊन आत्महत्या केली आहे.  ही घटना 8 एप्रिल 2024 रोजी रहाटणी येथे संयोग कॉलनी येथे घडली आहे.

याप्रकरणी  आनंद कुमार रामसुरत पटेल (वय 26 रा.माळेगाव, नाशिक) यांनी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. यावरून पती राहूल मुन्ना पटेल (वय27), दीर रोहित कुमार मुन्ना पटेल (वय 25) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

PCMC : रस्ते कामात ‘रिंग’च्या तक्रारीनंतर महापालिकेकडून चौकशी सुरू  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपी(Rahatani) डिसेंबर 2023 सालापासून छळ करत होते. आरोपी हे फिर्यादीला  हुंडा व गाडीसाठी माहेरून आठ ते दहा लाख घेवून ये म्हणून छळ करायला सुरुवात केली.

 

 

तसेच पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ, मारहाण करत शारिरीक व मानसीक छळ केला.त्यांच्या या छळाला कंटाळून पीडितेने बाथरूममधील अॅसिड पिऊन आत्महत्या केली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.