PCMC : रस्ते कामात ‘रिंग’च्या तक्रारीनंतर महापालिकेकडून चौकशी सुरू  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नऊ रस्त्यांच्या कामामध्ये रिंग ( PCMC ) झाल्याचे प्रकरण ठेकेदारांच्या तक्रारींमुळे चर्चेत आले. या कामांमध्ये निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या ठेकेदारांना पात्र व अपात्र ठरविण्यामध्ये गोलमाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात निविदा प्रक्रिया रद्द करून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. या तक्रारीवरून महापालिका प्रशासनाने कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे.

Railway News : प्रत्येक रेल्वे स्थानकावर मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न

महापालिकेने शहरातील विविध भागातील 9 रस्त्याच्या 90 कोटींच्या कामाची निविदा आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिध्द केली होती. या कामाच्या निविदा प्रक्रियेत अटी-शर्तीची पूर्तता करत नसताना काही ठेकेदार पात्र करण्यात आले. तर, पात्र असूनही काहींना अपात्र करण्यात आले. संबंधित ठेकेदारांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार केली.

त्यानंतर माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनीही आयुक्त सिंह व शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी या कामांच्या निविदांमधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. विद्युत विषयक कामासाठी जॉईण्ट व्हेन्चर आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली आहे. ते नसल्याने पात्र ठेकेदारास अपात्र ठरविले गेले. काही पात्र ठेकेदारांनी खासगी विकसकाकडे काम केलेल्या पुरावा दाखल ( PCMC ) केला. कामाचे पुरेसे पुरावे व प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत.

पंधरा वर्षांपासून महापालिकेचे काम करणारे ठेकेदार अपात्र ठरविण्यात आले. पात्र केलेल्या ठेकेदारांनी आवश्यक मशिनरींची यादी व पुरावे दिलेले नाहीत. काही ठेकेदारांचे राजकीय व्यक्तीशी संबधित असल्याचेही दिसून येते. ठेकेदाराचा स्वतःच्या मालकीचा हॉटमिक्स प्लांट आवश्यक आहे. त्याची पुर्तता केलेली नसताना ठेकेदार पात्र ठरल्याचे दिसते.

या सर्व बाबी या कामांच्या निविदांवरून निदर्शनास येत आहे. याची सखोल चौकशी करून निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करावी. खोटी कागदपत्रे सादर करणा-या ठेकेदारांवर, तसेच त्यांची तपासणी करणारे सल्लागार व अधिकारी यांचे संगनमत असेल, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. यापुढे कोणीही महापालिकेची फसवणूक करणार नाही, असे कलाटे यांनी तक्रारीत नमूद केले ( PCMC ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.