Car theft: काच फोडून कार मधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – कारच्या पाठीमागील बाजूची काच फोडून कार मधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 86 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास किवळे येथे घडली.

Pune news: भारतीय रेल्वेच्या केंद्रीकृत प्रशिक्षण संस्थानाने आपला 65वा स्थापना दिवस ‘इरिसेन दिवस’ च्या स्वरुपात साजरा

अजिंक्य बळवंत पैठणकर (वय 34, रा. किवळे, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य यांनी सामान आणण्यासाठी त्यांच्या मित्राची कार आणली होती. शनिवारी दुपारी सव्वाबारा ते साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांनी घरासमोर लावलेल्या कारची मागील बाजूची काच अज्ञाताने फोडली. कार मधून 66 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरट्याने चोरून नेली. अवघ्या 15 मिनिटात ही चोरी झाली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.