Child marraige : बालविवाह प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत तिला गरोदर केले.(Child marraige) याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत दापोडी येथे घडला.

याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 25 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune news: भारतीय रेल्वेच्या केंद्रीकृत प्रशिक्षण संस्थानाने आपला 65वा स्थापना दिवस ‘इरिसेन दिवस’ च्या स्वरुपात साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने फिर्यादीशी विवाह केला. त्यानंतर फिर्यादीसोबत वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केले, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(Child marriage) याप्रकरणी लैंगिक अत्याचार, मारहाण, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियनिमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.