Haveli : कदमवाकवस्ती येथे कोयत्याने हल्ला करत चौघांनी माजवली दहशत, पोलीस आरोपींच्या शोधात

एमपीसी न्यूज – मोटार सायकलने कट मारल्याचा जाब विचारल्याबाबत दोघांवर कोयत्याने जीवघेणा करून हल्ला करून मोटार सायकलवर आरडा ओरडा करत 4 आरोपी फरार झाले.

Pimpri : म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, इंदिरानगर चौक, कदमवाकवस्ती, ता. हवेली (Haveli) जि. पुणे येथे मनोज मोरे आणि त्यांचा मित्र सलमान बशीर पठाण हे गप्पा मारत थांबले होते. याठिकाणी भरधाव येणाऱ्या आरोपींनी मोटार सायकलने दोघांना कट मारले. त्याचा जाब त्यांनी विचारला असता आरोपींनी मनोज मोरे आणि सलमान पठाण यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मनोज मोरे यांच्या डोक्यात कोयता मारला.

यावेळी मनोज मोरे यांनी तो वार हुकवल्याने कोयता त्यांच्या डाव्या कानावर लागला. यावेळी त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सलमान पठाण यांच्यावर आरोपींनी कोयत्याने वार केला, तो ही वार सलमान पठाण यांनी अडविल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे.

त्यानंतर आरोपी त्यांच्या हातातील हत्यारे हवेत उंचावत परीसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवरुन आरडा-ओरडा करत पसार झाले. याबाबत लोणी – काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.