Pimpri : बीआरटीएस मार्गातील सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसवा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri ) -चिंचवड शहरातील वापरातील बीआरटीएस मार्गात सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

Sangavi : गॅस दाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी 20 जुलैपर्यंत बंद

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीएस रस्त्याचे जाळे आहे. ते व्यवस्थीत चालु आहेत. परंतु, बीआरटीएस मार्गात इतर खासगी वाहने देखील प्रवास करतात.

तसेच सिग्नलच्या जवळ बीआरटीएसचा सिग्नल सुटला की  डाव्या व उजव्या बाजुने नागरिक अनावधाने टर्न घेतात किंवा खासगी वाहने जोरात जातात. अशाने बरेच छोटे मोठे अपघात होतात व काही ठिकाणी जिवीतहाणी देखील झाली आहे. त्यामुळे बीआरटीएस मार्गा मधील सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.