Pune : पुण्यात एकतर्फी प्रेमातून महिलेवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहरातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असताना आता पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. एका महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

Pimpri : बीआरटीएस मार्गातील सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसवा – नाना काटे

संकेत शहाजी म्हस्के (वय 26, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे त्याचे नाव आहे. याबाबत येरवडा येथील 37 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट येथे बुधवारी सकाळी सात वाजता घडला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घटस्फोटीत आहे. खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत ती काम करते. काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्के याच्याशी त्यांची भेट होऊन ओळख झाली होती. त्याच्याबरोबर आणखी एकाबरोबर त्यांची मैत्री झाली होती.

 

दरम्यान, त्यांचा घटस्फोट झालेला पती पुन्हा त्यांच्या संपर्कात आला होता. संकेत म्हस्के याने एक महिन्यांपूर्वी माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणून फिर्यादीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

 

तेव्हा त्यांनी आपला पती पुन्हा संपर्कात असून मी तुझी फक्त मैत्रीण राहुल शकते, असे सांगितले होते. त्याचा नंबरही ब्लॉक केला होता. काही दिवसांनी त्यांनी त्याला पुन्हा अनब्लॉक केले. फिर्यादी या बुधवारी सकाळी सात वाजता बर्निग घाट येथे एका मित्राकडे आल्या होत्या. त्यावेळी संकेत रिक्षातून आला.

 

त्याने पाठीमागून येऊन फिर्यादीला पकडले. तू मला भेटत का नाही़ माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडते, तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत त्याने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या हातावर जोरात मारले. त्या खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून संकेत म्हस्के पळून गेला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.