Jestha : ओळख मराठी महिन्यांची – भाग 3 – मृग नक्षत्राची चाहूल

एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) – ज्येष्ठ मराठी  पंचांगातील तिसरा महिना! ज्येष्ठ नक्षत्रावरून (Jestha) या महिन्याला ज्येष्ठ हे नाव पडलेले आहे तसेच सूर्याची उष्णता या महिन्यात सर्वात जास्त म्हणजे जेष्ठ असते म्हणून हा ज्येष्ठ .
उन्हाने व्याकुळ झालेली धरणी माता आता आतुरतेने पावसाची वाट पाहत असते. ज्येष्ठ महिन्यातच मृग नक्षत्र असते. पावसाची सुरुवात मृग नक्षत्रापासून होते. या नक्षत्रावर पाऊस पडला की शेतकरी राजा खुश होतो शेतीच्या, पेरणीच्या कामांना सुरुवात होते या नक्षत्रावर पाऊस सुरू झाला तर पाऊस भरपूर पडणार असे मानले जाते.
आजपासून सुरू होणाऱ्या ज्येष्ठ प्रतिपदेपासून  गंगा दशहरा सुरू होत आहे. ज्येष्ठ महिन्यात नदी स्थानाला फार महत्त्व असते या महिन्यात आपल्या जवळपास असलेल्या नद्यांमध्ये विधी पूर्वक स्नान केले जाते.

Pune : पुण्यातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालया समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 2 हजार रुपयांच्या नोटेला हार घालत वाहिली श्रध्दांजली

ज्येष्ठात वटपौर्णिमा सावित्रीच्या व्रताचा महिमा

आपणा सर्वांना माहीत असलेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा महत्त्वाचा सण ! वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या सौभाग्य व सौख्यासाठी उपवास करतात. वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात  सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली यमाने हरण केले व सावित्री ने केलेल्या  तपस्येमुळे त्याच वडाच्या झाडाखाली सत्यवानाला पुन्हा जिवंत केले.

त्यामुळे वडाला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीत निसर्ग संवर्धनासाठी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या वृक्षांची पूजा सांगितली आहे  निसर्गाला वाचवण्यासाठी व वृक्ष संवर्धनासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले ही उपाययोजना आहे असे म्हणायला हरकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच महिन्यात येतो. याच महिन्यात रामाने सेतूवर रामेश्वराची स्थापना करून पूजा केली केली होती म्हणून रामेश्वरा ची पूजा देखील केली जाते.  या महिन्यात सूर्य उपासना करणे तसेच ‘ओम सूर्य आदित्य नमः ‘ हा मंत्र म्हटल्यास फायदेशीर होते असे शास्त्रात सांगितले आहे .
अशा प्रकारे उन्हाळ्याची समाप्ती व पावसाचे स्वागत करण्याच्या या महिन्याचे आपण सर्वजण स्वागत करू (Jestha) या!

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.