Pune : पुण्यातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालया समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी 2 हजार रुपयांच्या नोटेला हार घालत वाहिली श्रध्दांजली

एमपीसी न्यूज- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन हजार रुपयांच्या (Pune) नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला.या नोटा नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करता येणार आहेत.त्या निर्णयानंतर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.त्याच दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर 2 हजार रुपयांच्या नोटेला हार घालत श्रध्दांजली वाहण्यात आली.तर या आंदोलना वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक 10 लाख रुपये किंमतीच्या 2 हजार रुपयांच्या नोटा फुटपाथवर ठेवून निषेध नोंदविला.

 

Bhosari :  भोसरी मधून दोन किलो गांजा जप्त

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला गेला.या निर्णयानंतर काळा पैसा बाहेर येईल.त्यावेळी भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले.मात्र त्या निर्णया मधून काहीच साध्य झाल नाही.

उलट बँकेच्या रांगेत थांबून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहे. त्या सर्व बळीना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार होते. त्याबाबत नरेंद्र मोदी यांनी कधीच भूमिका मांडली नाही. कर्नाटक राज्यातील पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.यातून काय साध्य होणार आहे, हे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pune) यांनी सांगावे,अशी मागणी देखील त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.