Bhosari :  भोसरी मधून दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी मधील लांडगे नगर येथून अंमली (Bhosari) पदार्थ विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी दिनांक 19 करण्यात आली.

अमर निवृत्ती जेधे (वय 28), एक महिला (वय 40, दोघे रा. लांडगेनगर, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : तब्बल 12 वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळणार सभापती; बुधवारी होणार निवडणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगेनगर येथे दोघांनी विक्रीसाठी गांजा बाळगला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन किलो गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण एक लाख 86 हजार 25 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.