Kasarwadi : दुकानातील इलेक्ट्रिक मीटरला आग

एमपीसी न्यूज – दुकानातील महावितरणच्या मीटर ( Kasarwadi) बॉक्‍सला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 18) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.

Mumbai : यापुढे शिवतीर्थावर मेळाव्यासाठी अर्ज करायचा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री 1.54 वाजताच्या सुमारास फैजल यांनी माहिती दिली की, कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या एका टी स्टॉलमधील महावितरणच्या मीटर बॉक्‍सला आग लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशामक उपकेंद्र आणि संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी त्वरीत आगीवर नियंत्रण ( Kasarwadi) मिळविले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.