Mumbai : यापुढे शिवतीर्थावर मेळाव्यासाठी अर्ज करायचा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

एमपीसी न्यूज – “बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्वाच्या विचारांचा मेळावा (Mumbai ) आझाद मैदानावर होतोय. मैदानासाठी वाद विवाद नको. यापुढे शिवतिर्थासाठी अर्ज करायचाच नाही”, अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची मंगळवारी ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझामध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

दसरा उत्सवाला शिवसेना पक्षात विशेष महत्व आहे. दसऱ्याच्या निमित्ताने (Mumbai ) दर वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यात येतो. हजारो शिवसैनिक आणि कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी खेड्यापाड्यातून, विविध शहरांमधून मुंबईला येतात. हा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावर होतो.

Pimpri : स्टोअर मॅनेजरनेच चोरले शॉपीतील 23 मोबाईल

मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात उभी फुट पडली. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट; दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मागील वर्षी दोन्ही गटाने छत्रपती शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केले होते. त्यानंतर तो वाद न्यायालयात गेला.

न्यायालयाने ठाकरे गटाला मेळावा घेण्याची परवानगी दिली. तथापि, यावर्षीही (Mumbai ) शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाने महापालिकेकडे अर्ज केला होता. शिंदे गटाने यावेळी दसरा मेळाव्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत अर्ज मागे घेतला आणि मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर घेण्याचे ठरवले. त्यामुळे ठाकरे गटाला शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

तथापि, एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. “बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्वाच्या विचारांचा मेळावा आझाद मैदानावर होतोय. मैदानासाठी वाद विवाद नको. यापुढे शिवतिर्थासाठी अर्ज करायचाच नाही”, अशी मोठी आणि ऐतिहासिक घोषणा एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून (Mumbai ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.