Pimpri : स्टोअर मॅनेजरनेच चोरले शॉपीतील 23 मोबाईल

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील एका मोबाईल शॉपीमध्ये काम करणाऱ्या (Pimpri) स्टोअर मॅनेजरने 23 मोबाईल चोरल्याचे उघड झाले आहे . हा प्रकार ऑगस्ट 2022 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत पिंपरी येथील कॅशीफाई स्टोअर येथे घडली आहे.

याप्रकरणी तब्ब्ल वर्षभरानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.17) विवेक सुरेश भिंगारकर (वय 33 रा.कोथरूड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून धर्मराव सुर्यनारायण कुर्माना (वय 40 रा. बोपखेल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : कंपनीचा 95 लाखांचा माल घेऊन कंटेनर चालक पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मोबाईल शॉपी मध्ये  स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतात. पदाचा व विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने दुकाना आलेल्या मोठ्या कंपन्याचे जुने 61 हजार 200 रुपयांचे 23 फोन व एअरबडस चोरून नेले आहेत.

तसेच दुकानातील रकमेचा अपहार केल्याचा ही आरोप फिर्यादीत केला आहे. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीला (Pimpri) अटक केलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.