Chakan : कंपनीचा 95 लाखांचा माल घेऊन कंटेनर चालक पसार

एमपीसी न्यूज –  कंपनीने बंगळूर येथे पाठवलेला 95 लाखांचा (Chakan) माल घेऊन कंटेनर चालक हा पसार झाला आहे. हा सारा प्रकार 10 ऑक्टोबर ते आजपर्यंत चाकण येथील टाटा मोटर्स वाकी येथे घडला आहे.

Hinjawadi : पावणे पाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरवर गुन्हा

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.17)  कंपनी सुपरवाझर सनी भुपसिंग चौधरी (वय 31 रा. भिंवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कंटेनर चालक रमेश अजय राजभर (वय 29 रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील एमएच 04 एलई 4096 या कंटनेर मध्ये कंपनीचा 95 लाख 3 हजार 724 रुपयांचा माल भरला. तो माल चाकण ते बंगळूरला पाठवला होता.

मात्र रमेश याने कंटेनर बंगळूरला येथे न नेता 95 लाख रुपयांच्या साहित्याचा अपहार केला आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.