Hinjawadi : पावणे पाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरवर गुन्हा

एमपीसी न्यूज –  विश्वासाचा गैरफायदा घेत हॉटेल मॅनेजरने गिऱ्हायकांचे (Hinjawadi) पैसे, सामान खरेदीची रक्कम, व्हेंडर पेमेंट, कॅश काऊंटरमधील पैसे या रकमांचा अपहार करत हॉटेल व्यावसायीकाची तब्बल 4 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हि घटना 23 मे ते आज अखेर पर्यंत हिंजवडी फेज एक येथील हॉटेल डॉर्टन येथे घडली आहे.

याप्रकरणी सुमेरसिंग सागरमल झाझेडिया (वय 25 रा.वाकड) यांनी सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आशीष कोडींबा धेबे (रा. माण, हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : बालाजीनगरमध्ये सिलेंडरला आग; त्वरीत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा विश्वास संपादन करत आरोपीने वेळोवेळी ग्राहकांनी केलेले पेमेंट स्कॅनर द्वारे 65 हजार स्वतःच्या खात्यात वळवून घेतली.

तसेच हॉटेल कर्मचाऱ्याकडून व्यवसायाची रक्कम 92 हजार  , हॉटेलच्या कॅश काउंटर मधून 1 लाख 28 हजार रुपये, हॉटेल साहित्याच्या खरेदीच्या रकमेतून 66 हजार, व्हेंडरला द्यायच्या पेमेंट मधून 1 लाख 17 हजार असे वेळोवेळी मिळून 4 लाख 87 हजार 512 रुपयांचा अपहार केला आहे.

फसवणूक झाल्याचे उघड होताच हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात (Hinjawadi) आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.