Khadki : खडकीत टोळक्याने घरात घुसून आईसह मुलांना केली मारहाण

एमपीसी न्यूज – खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दर्गा वसाहत येथे घरात टीव्ही पाहत असलेल्या (Khadki)  आई आणि मुलांना तिघांनी बेदम मारहाण केली. 13 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tomato : ग्राहकांना मोठा दिलासा, टोमॅटोच्या दरात मोठी घट

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे घरात टीव्ही पाहत असताना त्यांच्या ओळखीचे दोन आरोपी आणि त्याच्यासोबत आणखी एक मुलगा अशी तिघेजण घरात शिरले. त्यांनी फिर्यादीचा लहान भाऊ आणि आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी हे बचाव करण्यासाठी गेले असता आरोपीने धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केले.

या गोंधळानंतर आजूबाजूचे नागरिक जमा झाल्याने आरोपी लोकांवर दगडफेक करून गाडीवर बसून पळून गेले आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक (Khadki) तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.