Tomato : ग्राहकांना मोठा दिलासा, टोमॅटोच्या दरात मोठी घट

एमपीसी न्यूज – टोमॅटोच्या दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या (Tomato) दरांनंतर आता ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टोमॅटोच्या दरात मोठी घट झालीये. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात दर कमी झालेत. 125 ते 200 रुपयांवर गेलेले घाऊक बाजारातील दर आता 70  ते 85 रुपयांवर उतरले आहेत.

पुणे बाजार समितीत रविवारी नऊ हजार क्रेटची आवक झाली. नाशिक, पुणे, मुंबई बाजार समितीत आवक वाढली आहे. पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत.

 

अचानक टोमॅटोचे भाव निम्म्याने कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने लागवड केलेला टोमॅटो मार्केटमध्ये आल्याने क्रेट मागे 50 टक्के घट झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो 50 ते 85 रुपये प्रतिकिलो बाजरभावाने विकला (Tomato) जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.