Vadgaonsheri : टोमॅटोचा भाव विचारल्याने पुण्यात ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज – सध्या बाजारामध्ये टोमॅटोला 100 रुपये किलोचा दर असून (Vadgaonsheri)  पेट्रोल डिझेलच्या प्रती लिटर दरापुढे टोमॅटोचा दर गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या दरवाढीचा फायदा एका बाजूला शेतकर्‍यांना होत आहे.तर दुसऱ्या बाजूला याचा फटका सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे.याच दरम्यान पुण्यातील वडगावशेरी येथील भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या दरावरून विक्रेता आणि ग्राहकांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे.

अनिल गायकवाड असे आरोपी विक्रेत्यांचे नाव असून गोपाल ढेपे असे पीडित व्यक्तींचे नाव आहे.

Talegaon : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास गोपाल ढेपे हे वडगावशेरी येथील भाजी मार्केटमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी गेले होते.त्यावेळी टोमॅटो कसे दिले असे विचारल्यावर 20 रुपये पावशेर असा भाव आरोपी अनिल गायकवाड यांनी गोपाल ढेपेंना सांगितला.

टोमॅटो खूपच महाग म्हटल्यावर गोपाल ढेपे आणि आरोपी गायकवाड या दोघांमध्ये वाद सुरू झाला.त्याच दरम्यान आरोपीने तक्रारदार ढेपे यांच्या तोंडावर वजन कटयातील वजन  फेकून मारले. यामध्ये गोपाल ढेपे जखमी झाले आहे.या मारहाण प्रकरणी अनिल गायकवाड याच्या विरोधात गोपाल ढेपे यांनी तक्रार दाखल केली असून  चंदननगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला (Vadgaonsheri) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.