Chakan : चाकणमध्ये टोमॅटोचे भाव 50 टक्क्यांनी कोसळले; किलोला 50 ते 60 रुपये दर

एमपीसी न्यूज – नेपाळमधून आवक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बाजारात वाढलेली स्थानिक आवक यामुळे टोमॅटोचे भाव 50 टक्क्यांनी कोसळले ( Chakan ) आहेत.

खेड बाजार समितीच्या चाकण मधील घाऊक तरकारी बाजारात काही दिवसांपूर्वी टॉमेटोच्या 20 किलोच्या क्रेटला सरासरी 2300 ते 2500 रुपये भाव मिळाला होता. शनिवारी (दि. 12)  हा भाव निम्म्याने घसरला. येत्या काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अचानक भावात मोठी घसरण सुरु झाल्याने ग्राहक खुशीत असला तरी टोमॅटो उत्पादक हादरले आहेत.

Dapodi : दापोडी मेट्रो स्थानकावर देशभक्तीपर गीतांद्वारे साजरा होणार स्वातंत्र्य दिवस

चाकण मधील अडत्यांनी सांगितले कि, मागील आठवड्यात घाऊक बाजारात कांद्याचे दर 100 ते 120 रुपये किलो होते. आता हेच दर 50 ते 60 रुपये किलोपर्यंत ( Chakan ) खाली आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या मागणीत अचानक वाढ झाली.

खेड बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक 2 ते 4हजार क्रेट्सपर्यंत येत असल्याने आणि प्रतिक्रेट 2300  ते 2500 रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक आनंदात होते. घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव अधिक प्रमाणात वाढल्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेपाळहून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातच राज्याच्या अन्य भागातून बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. या दुहेरी घडामोडींमुळे शनिवारी टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले असल्याचे अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष कुमार गोरे यांच्यासह ( Chakan ) अडत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.