Pune : पुणे विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाऊस

एमपीसी न्यूज – जुलैमध्ये पडलेल्या पावसाने  पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला, वरसगाव, टेमघर, पानशेत ही चार धरणे भरली असली (Pune) तरी पुणे शहरामध्ये आजपर्यंत केवळ गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाऊस झाला असल्याची माहिती भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत कार्यरत असणारे  संशोधक विनीत कुमार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

Chakan : चाकणमध्ये टोमॅटोचे भाव 50 टक्क्यांनी कोसळले; किलोला 50 ते 60 रुपये दर

पुणे विभागात यंदा 255.3 मिमी पाऊसच  पडला आहे. जो सामान्यपेक्षा 143.8 मिमी कमी आहे.गेल्या वर्षी (1 जून-12 ऑगस्ट) पुणे शिवाजीनगरमध्ये 544 मिमी पाऊस पडला होता.
या पावसाळ्यात आतापर्यंत पुण्यातील शिवाजीनगरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाऊस झाला आहे.

त्यामुळे पुणेकरांना वर्षभराच्या पाण्याची बेगमी झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाऊस पडणे ही बाब  चिंताजनकच (Pune) आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.