Sangvi : कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून नागरिकांची सुमारे 23 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देण्याचे खोटे अमिष (Sangvi) दाखवत नागरिकांना सहा जणांनी तब्बल 23 लाखांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 31 मे 2015 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत घडला.
शंकर संभाजी गायकवाड (वय 66, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 11) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्षद सुखदेव चौधरी (रा. पुणे), सचिन नामदेव भोसले (रा जुनी सांगवी), सत्यम अविनाश जोशी (रा जुनी सांगवी) व दोन महिला आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर काही नागरिकांना वरील आरोपींनी मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवले. यासाठी नागरिकांकडून तब्बल 25 लाख 30 हजार रुपये कंपनीत गुंतवून घेतले. सुरुवातीला त्यांनी परतावा म्हणून नऊ लाख रुपये त्यांना परत देखील केले. परंतु त्यांनी नंतर परतावा व मुद्दल हे दोन्ही देणे बंद केले.
यामध्ये फिर्यादी यांचे एकूण 18 लाख 30 हजार रुपये, राजेंद्र जावळे यांचे तीन लाख 54 हजार रुपये व दीपक कुमार यांचे एक लाख रुपये असे एकूण 22 लाख 84 हजार 500 रुपयांची फसवणूक आरोपींनी केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत (Sangvi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.