Pune : पूर्व भागातील पाणीपुरवठा आता सुरळीत – नंदकिशोर जगताप

एमपीसी न्यूज : भामा-आसखेड पंपिंगमध्ये केबल (Pune ) तुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पण, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. आता विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात कोणत्याही तक्रारी नाहीत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

वडगावशेरी, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, चंदननगर या पूर्व भागाला भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पूर्व भागातील अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा लक्षात घेऊन या भागाला भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण, भामा-आसखेड धरणातून या भागाला पाणीपुरवठा होत असला तरी वारंवार बिघाडामुळे या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या सातत्याने कामय राहिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Cricket News : महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी होणार निवृत्त; बीसीसीआयचा निर्णय

भामा-आसखेड पंपिंग आणि जॅकवेलमधील तांत्रिक बिघाडामुळे शहराच्या पूर्व भागाला गेले दोन दिवस पाणीबाणीचा सामना करावा लागला. पंपिंग स्टेशनमधील केबल तुटल्याने बुधवार व गुरुवारी पूर्व भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सलग दोन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.