Cricket News : महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी होणार निवृत्त; बीसीसीआयचा निर्णय

एमपीसी न्यूज – बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त (Cricket News) करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे. यापूर्वी 2017 मध्येही महान फलंदाज सचिन तेंडुलकरची सही असलेली 10 क्रमांकाची जर्सीही कायमची निवृत्त झाली होती.

टीम इंडियाचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीची आयकॉनिक नंबर 7 जर्सी यापुढे इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला उपलब्ध होणार नाही. धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर सुमारे 3 वर्षांनी बीसीसीआयने हा निर्णय घेतला. बीसीसीआयने सांगितले की धोनीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्या टी-शर्टवर जो नंबर परिधान केला होता तो 7 क्रमांक निवृत्त करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

Kondhwa : दफनभूमी असो की स्मशानभूमी ती लोकवस्तीच्या बाहेरच असावी – प्रमोद नाना भानगिरे

धोनीचा टी-शर्ट निवृत्त झाल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात समोर आली आहे. असा सन्मान मिळवणारा पहिला क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलर आहे. या अहवालात असे म्हटले आहे की धोनीची आयकॉनिक क्रमांक 7 जर्सी इतर कोणताही भारतीय क्रिकेटपटू परिधान करणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी, धोनीने परिधान केलेला नंबर त्याच्या खेळातील योगदानाला समर्पित करण्यासाठी ‘निवृत्त’ करण्यात आला आहे.

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला (Cricket News) होता. 2014 मध्येच त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली होती. या अहवालात असे म्हटले आहे की बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना, विशेषत: पदार्पण करणाऱ्या खेळाडूंकडे तेंडुलकर आणि धोनीशी संबंधित क्रमांकाचा पर्याय नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.