Kondhwa : दफनभूमी असो की स्मशानभूमी ती लोकवस्तीच्या बाहेरच असावी – प्रमोद नाना भानगिरे

एमपीसी न्यूज – कोंढवा हे सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा (Kondhwa) परिसर म्हणून परिचित आहे. मात्र, कोंढव्यात जिथे हिंदू लोकवस्ती आहे. त्या भर लोकवस्तीत मुस्लिम समाजाची  दफनभूमी बांधण्यात येणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे या दफनभूमीसाठी येथील लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे तशी विनंतीही केली होती.

दरम्यान, यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी, “आमचा कोणत्या समाजाला विरोध नाही. मात्र, दफनभूमी असो की स्मशानभूमी ही लोकवस्तीच्या बाहेर असते. त्यामुळे संबंधित जागेवर दफनभूमी न बांधता हे क्रीडांगण लहान मुलांसाठीच ठेऊन, मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी महानगरपालिकेने दुसरी जागा सूचित करावी” असे सांगितले.

IPL 2024 : हार्दिक पंड्या मुंबईचा इंडियन्सचा नवा कर्णधार

कोंढव्यातील साधारणतः 10 ते 15 हजार हिंदू लोकवस्ती असलेल्या सर्वे नं 44 या भागात, लहान मुलांच्या खेळासाठी महानगरपालिकेने 45 लाख रुपयांचा निधी मंजुर करून दिला होता. मात्र त्यानंतर विद्यमान आमदार चेतन तुपे व माजी आमदार योगेश टिळेकर यांनी यामध्ये हस्तक्षेप करत, महानगरपालिकेकडे संबंधित ठिकाणी मुस्लिम समाजाची दफनभूमी व्हावी, यासाठी मागणी केली होती. तशा मथळ्याचे त्यांनी पत्र लिहून आयुक्तांसमोर सादरही केले होते.

त्यांनतर कोंढाव्यातील हिंदू लोकवस्तीमध्ये असलेल्या या लहान मुलांच्या  (Kondhwa) क्रीडांगणाचे दफनभूमीत रूपांतर करू नये. यासाठी कुमार पृथ्वी सोसायटी, जिता सोसायटी, रविराज कोडोलेरी, आचल सोसायटी, वर्धमान सोसायटी, इशापर्न सोसायटी, काकडे वस्ती आणि साईबाबा नगर येथील नागरिकांनी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरेंची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली.

त्यानंतर लगेचच प्रमोद नाना भानगिरे या नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. प्रमोद नाना भानगिरे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन जागेची पहाणी केली व पुणे महानगरपालिकेकडे यासंबंधी भर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी दफनभूमी न करण्यासाठी निवेदन दिले आहे. आयुक्तांनी नागरिकांच्या या मागणीवर विचार करून, संबंधित जागेवर कोणतेही दफनभूमी होणार नसून, ती जागा लहान मुलांच्या क्रीडांगणासाठीच राखीव राहील असे स्पष्ट सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.