IPL 2024 : हार्दिक पंड्या मुंबईचा इंडियन्सचा नवा कर्णधार

एमपीसी न्यूज – इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी (IPL 2024) मोसमासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. 2013 पासून संघाचे नेतृत्व करत असलेल्या रोहित शर्माच्या जागी आता पंड्या येणार आहे. एमआयचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स महेला जयवर्धने म्हणाले की, पंड्याची नियुक्ती फ्रँचायझीच्या भविष्यासाठी रेडी’ असण्याच्या तत्वाला धरून केली आहे.

सचिनपासून ते हरभजनपर्यंत आणि रिकीपासून रोहितपर्यंत मुंबई इंडियन्सला नेहमीच अपवादात्मक नेतृत्व लाभले आहे. ज्यांनी तत्काळ यशात योगदान देताना भविष्यासाठी संघ मजबूत करण्यावर नेहमीच लक्ष ठेवले आहे. या तत्वाला अनुसरून हार्दिक पंड्या आयपीएल 2024 च्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारेल,” असेही महेलाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Cricket : कोहिनूर ग्रुप इलेव्हन आणि वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी विजयी

रोहित शर्माच्या अपवादात्मक नेतृत्वाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. 2013 पासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ हा काही असामान्य होता. त्याच्या नेतृत्वाने संघाला केवळ यश मिळवून दिले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून त्याचे स्थान पक्के केले असल्याचे जयवर्धनेने सांगितले.

तो पुढे म्हणाला “रोहितच्या मार्गदर्शनाखाली, एमआय आतापर्यंतच्या (IPL 2024 ) सर्वात यशस्वी आणि प्रिय संघांपैकी एक बनले. एमआयला आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या मार्गदर्शन आणि अनुभवाची अपेक्षा करू. एमआयचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचे आम्ही स्वागत करतो आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देतो,”

पांड्याच्या नेतृत्वाखाली, GT ने 2022 मध्ये विजेतेपद जिंकले आणि 2023 च्या मोसमात उपविजेते ठरले. नुकत्याच झालेल्या ट्रेडिंगमध्ये मुंबईने हार्दीकला 15 कोटी रुपयात गुजरात टायटन्स कडून खरेदी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.