Cricket : कोहिनूर ग्रुप इलेव्हन आणि वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी विजयी

एमपीसी न्यूज : थेरगाव येथे सुरु असलेल्या U19 वुमेन्स व्हेरॉक कप 2023 स्पर्धेत आज झालेल्या 2 साखळी (Cricket) सामन्यात कोहिनूर ग्रुप इलेव्हन आणि वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी हे दोन संघ विजयी ठरले आहेत.

कोहिनूर ग्रुप इलेव्हनच्या संघाने हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमीचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करतांना कोहिनूरच्या संघाने 142 धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये प्रतिभा माशाळे हिने 71 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिला अथश्री शिवरकर 38 धावा हिने सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरात हेमंत पाटीलचा संघ 130 धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात प्रतिभा माशाळे सामना वीरांगना ठरली.

Mahalunge : पायी जाणाऱ्या दोन तरुणांना कंटेनरची धडक, अपघातात एकाचा मृत्यू

दुसऱ्या सामन्यात वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने किंग्स स्पोर्ट्स क्लबच्या संघाला 50 धावांनी नमविले. प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सने 146 धावा केल्या. यामध्ये आर्य शेवाळे हिने 59 धावांची संयमी अर्धशतकी खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्सच्या (Cricket) संघाला केवळ 96 धावाच करता आल्या. किंग्सकडून रिशिकाने सर्वाधिक 37 धावा केल्या. या सामन्यात 3 विकेट्स घेणारी कोहिनूरची सेजल सुतार सामानाविरांगाना ठरली.

दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी दोन उपांत्य सामने पार पडणार असून यामध्ये पहिला उपांत्य सामना व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी विरुद्ध कोहिनूर ग्रुप इलेव्हन यांच्यामध्ये होणार आहे.. तर दुसरी लढत वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध आर्यन्स क्रिकेट अकॅडमी यांच्यात रंगणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.