Mahalunge : पायी जाणाऱ्या दोन तरुणांना कंटेनरची धडक, अपघातात एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रात्र पाळी नंतर पायी चालत घरी जाणाऱ्या दोन तरुणांना (Mahalunge) एका कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात खराबवाडी येथे गुरुवारी (दि.15) सकाळी सहा वाजता घडला.

या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात देवसिंग शिवलाल सिंग लोधी (वय 24 खराबवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तर या अपघातात पप्पू भवरीसिंग लोधी (वय 22 रा खराबवाडी) याचा मृत्यू झाला आहे.

Chinchwad : पवना सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी वसंत लोंढे यांची बिनविरोध निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पप्पू हे रात्रपाळी संपवून पायी घरी चालत जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर बेदरकारपणे चालवून त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात फिर्यादी किरकोळ जखमी झाले , तर पप्पू यांना गंभीर (Mahalunge) दुखापत झाली.  यातच त्यांचा मृत्यू झाला.  अपघात झाल्यानंतर कंटेनर चालकाने  कोणतीही मदत न करता तो तिथून पळून गेला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.