Chinchwad : पवना सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी वसंत लोंढे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी (Chinchwad) वसंत आनंदराव लोंढे यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या चिंचवड येथील मुख्य कार्यालयात उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (दि. 15) निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

उपाध्यक्ष पदासाठी वसंत आनंदराव लोंढे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे अध्यासी अधिकारी प्रगती वाबळे यांनी उपाध्यक्षपदी वसंत आनंदराव लोंढे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर अध्यासी अधिकारी, बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व इतर संचालकांनी उपाध्यक्ष वसंत आनंदराव लोंढे यांचा सत्कार केला.

यावेळी बँकेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, संचालक विठठ्ल काळभोर, शांताराम गराडे, शामराव फुगे, शिवाजी वाघेरे, जयनाथ काटे, जितेंद्र लांडगे, शरद काळभोर, सुनिल गव्हाणे, सचिन चिंचवडे, अमित गावडे, बिपिन नाणेकर, सचिन काळभोर, चेतन गावडे, दादू डोळस, संभाजी दौंडकर, संचालिका जयश्री गावडे, अॅड. उर्मिला काळभोर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनेश बबन बो-हाडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

TDR Scam : टीडीआर घोटाळ्यात शहरातील तिन्ही आमदारांचा सहभाग; महाविकास आघाडीचा आरोप

पवना सहकारी बँक ही शहरातील सर्वात जुनी बँक आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते कै. आण्णासाहेब मगर यांनी केली आहे. बँकेला 2 ऑक्टोबर 2023 रोजी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. माजी आमदार ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे यांनी सर्वांना (Chinchwad) सोबत घेवून बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला. कामगार नगरी पिंपरी-चिंचवड मधील सर्वसामान्य, कष्टकरी नागरीकांची ‘अर्थवाहिनी’ अशी पवना सहकारी बँकेची ओळख निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.