Khed : जलसंपदा विभागाच्या कार्यालयात चोरी

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे असलेल्या (Khed) जलसंपदा विभागाच्या भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभाग कार्यालयात चोरी करत चोरट्यांनी 24 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वसंत महादू ढोकरे (वय 53, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली. उपविभाग कार्यालयातील सिंचन व्यवस्थापक यांच्या कार्यालयाचे कुलूप व कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला.

Alandi : तरुणाला मारहाण करत कोयता फिरवून दहशत पसरवणाऱ्या टोळक्यावर गुन्हा  

कार्यालयातून लेजरजेट प्रिंटर, दोन गॅस टाकी आणि शेगडी, डंपी (Khed) लेवल मशीन, लोखंडी चैनपुली व इतर साहित्य असा एकूण 24 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.