LLB CET: सीईटी नोंदणीस मुदतवाढ; मनसेचे सरचिटणीस विद्यानंद मानकर यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी व्यावसायिक पदवी (LLB CET) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एलएलबी (3 वर्षे)  सीईटी नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक  शिक्षकेतर सेनेचे  सरचिटणीस विद्यानंद मानकर यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला  यश आले आहे.

तीन वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या  प्रवेशासाठी होत असलेल्या एमएचटी-सीईटी नोंदणीसाठी अर्ज करण्याबाबतची मुदत संपली होती. परंतु, महाराष्ट्रातील विविध विभागातून खूप विद्यार्थी, विद्यार्थीनी या नोंदणीपासून वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांची मुदतवाढ देण्याची मागणी होती. त्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे राज्य  सरचिटणीस विद्यानंद मानकर यांनी नोंदणी मुदत कमीतकमी दोन दिवस उपलब्ध करून देण्यात यावी.

Pune : संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन

जेणेकरून वंचित विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना नोंदणी करून कायदा शिक्षण घेण्यास पात्र होता येईल. वंचित विद्यार्थ्यांच्या विनंतीवर सहानभुती पूर्वक विचार करून एमएचटी-सीईटी नोंदणी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांकडे केली होती. या मागणीला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला. तीन वर्षाच्या सीईटीची परीक्षा 2, 3 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या परिक्षेच्या सीईटीसाठी अर्ज करण्यास दोन दिवसांची म्हणजेच 20 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सीईटी परिक्षेसाठी (LLB CET) अर्ज करता येणार आहेत. परीक्षा देता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.