Mahalunge : पिकपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिकपने पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिकप चालकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री नऊ वाजता खेड तालुक्यातील शिंदे गावात वासुली रोडवर घडली.

Pimpri : दुकानातील कामगाराने दुकानात केली चोरी

काळूराम रघुनाथ शिंदे (वय 32, रा. पापळवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या पिकप चालकाचे नाव आहे. याप्रकरणी जावेदआलम हारून अन्सारी (वय 22, रा. वासुली, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे याने त्याच्या ताब्यातील पिकप (एमएच 14/केए 8042) भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या मित्राला पाठीमागून धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी यांच्या मित्राचा मृत्यू झाला. महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.