Pune : इंदिरा आरोग्य सेवेचे 152वे शिबीर संपन्न

एमपीसी न्यूज – प्रताप गोगावले आणि परिवाराच्या वतीने घेण्यात येणारे 152 वे मोफत इंदिरा आरोग्य शिबीर रविवारी (दि. 3) पार पडले. मागील 13 वर्षांपासून  मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम नियमितपणे सुरु आहे. ज्या गरजू नागरिकांना वैद्यकीय सेवेचा आर्थिक भार पेलवत नाही, अशा नागरिकांना या शिबिरांतर्गत मदत करण्यात येत आहे.

Mahalunge : पिकपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

इंदिरा मोफत आरोग्य सेवेसाठी जनरल फिजिशियन डॉ. दीपक सोनार, डॉ. दीपक गुजर, होमिओपॅथीक डॉ. सचिन मेहता,डॉ. मृणाल सोलंकी, दीपिका गांधी, अस्थिरोग तज्ञ डॉ. शेखर माळवे, बालरोग तज्ञ डॉ. सूर्यकांत घुगरी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमित संकपाळ, प्रीती संकपाळ, डॉ. दत्तराज करडे यांनी नागरिकांची तपासणी केली.

प्रताप गोगावले म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा परवडत नाहीत. काहींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते हा भार पेलू शकत नाहीत. अशा सर्व लोकांसाठी इंदिरा आरोग्य मोफत सेवा शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. तसेच मोफत औषधे देखील दिली जातात. औषधे आणि श्री स्वामी समर्थ यांची कृपा या दोन्हींचा रुग्णांना फायदा होतो, असेही ते म्हणाले.

इंदिरा आरोग्य मोफत सेवा शिबीर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी 49 मंगळवार पेठ येथील ‘श्री स्वामी समर्थ गोगावले मठ (श्री स्वामी प्रासाद बिल्डिंग’)मध्ये होते. या शिबिरामध्ये जनरल ओपीडी, होमिओपॅथिक, त्वचारोग, हाडांचे रोग, स्त्री रोग,डॉ.अमित संकपाळ, लहान मुलांचे आजार अशा सर्व प्रकारची तपासणी व उपचार केले जातात. प्रताप गोगावले आणि परिवाराने आजवर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

या सर्व उपक्रमांमध्ये मठातील सेवेकरी सदोदित कार्यतत्पर राहतात. श्रीधर गोगावले, राहुल पाटोळे, उज्वल पोकर्णा, श्रीकांत चिंचवडे, प्रणव स्वामी, कुलदिप गोंडाळ, विशाल घेवडे (फार्मासिस्ट), श्रीकांत डाळ्या, अपर्णा पोतदार, अवधूत नाटे, काजल शर्मा, दत्ता वालगुडे, राकेश बजाज आदी सेवेकरी सदैव सेवेसाठी तत्पर असतात.

इंदिरा आरोग्य मोफत शिबिराचा आत्तापर्यंत 5 हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. प्रत्येक शिबिरात सुमारे 200 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे दिली जातात.

https://youtu.be/E4L81HM8Pp0?si=otCA1SfmvgGhPgmI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.