Wakad : दीड लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुनी कार खरेदी करताना ठरलेल्या रकमेतील उर्वरित एक लाख 40 हजार रुपये न देता मूळ कार मालकाची फसवणूक केली. ही घटना 19 मे 2021 ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत भुजबळ चौक, वाकड येथे घडली.

Pune : इंदिरा आरोग्य सेवेचे 152वे शिबीर संपन्न

कैलास तुळशीदास भोरे (वय 32, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक जडीयप्पा कुराडे (वय 40, रा. नागेवाडी, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोरे यांनी त्यांची कार (एम एच 12/केएन 6343) आरोपी कुराडे याला दोन लाख 60 हजार रुपयांना विकली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना वेगवेगळ्या माध्यमातून एक लाख 20 हजार रुपये दिले.

उर्वरित एक लाख 40 हजार रुपये दोन महिन्यात देण्याचा व्यवहार ठरला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला कार दिली. आरोपीने ठरलेल्या मुदतीत फिर्यादी यांना पैसे न देता पैशांची मागणी केल्यास पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली. वाकड (Wakad)पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.