Wakad : राजस्थानहून अफिम विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

एमपीसी न्यूज – राजस्थान येथून पिंपरी-चिंचवड शहरात अफिम विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 898 ग्राम वजनाचे अफिम जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) सायंकाळी भुजबळ चौक, वाकड येथे करण्यात आली.

Wakad : दीड लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

नारायण चेतनराम चौधरी (वय 41, रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने हे अफिम त्याचा साथीदार सुगनाराम (रा. राजस्थान) याच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ चौक वाकड येथे एक व्यक्ती अफिम विक्रीसाठी आला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी नारायण चौधरी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन लाख 59 हजार 200 रुपये किमतीचा अफिम हा अमली पदार्थ आढळून आला. त्याने राजस्थान येथून हा अफिम पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.