Pune : पुण्यात दिवेघाटात बिबट्याला गाडीची धडक, रस्त्यातच बसला

एमपीसी न्यूज – पुण्यात (Pune ) सासवड रोडवर दिवे घाटात जखमी अवस्थेत बिबट्या रस्त्यावर बसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्याच्या मधोमध बिबट्या बसल्याचं दिसत आहे. याआधी आणखीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात रस्त्याच्या कडेने बिबट्या दुचाकीस्वाराच्या समोरून चालत जात होता. यानंतर वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

Wakad : राजस्थानहून अफिम विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

दिवेघाटातल्या व्हायरल होत असलेल्या बिबट्याच्या व्हिडीओबाबत अशीही माहिती मिळते की, पुणे सासवड रस्त्यावर असलेल्या दिवेघाटात बिबट्या एका गाडीला धडकला. या धडकेत बिबट्या जखमी होऊन रस्त्यातच बसला. तेव्हा आजूबाजूने गाड्या जात आहेत. यातीलच एका वाहनचालकाने व्हिडीओ शूट केला आहे.

बिबट्या जखमी अवस्थेत जात असतानाचा दुसरा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. त्यात बिबट्याला मार लागल्याचं दिसतंय. वनअधिकाऱ्यांना बिबट्याचे रक्तही रस्त्यावर पडल्याचं आढळून आलं. त्यामुळे बिबट्या रस्त्यावरून खाली उतरला असण्याची शक्यता आहे. बिबट्याला ड्रोनच्या मदतीने शोधलं जात असून तो सापडल्यास त्याच्यावर उपचार केले जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

लोणी काळभोरजवळील रामदरा आणि दिवेघाटातील कानिफनाथ या डोंगराळ भागामध्ये सध्या सायाळ, हरिण, मुगूंस, उदमांजर, मोर, ससे, हरीण अशा विविध प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे. या प्राण्यांबरोबर बिबटयानेही दर्शन दिल्याने दिवे घाटातून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांबरोबर स्थानिक नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.