Talegaon : तेव्हा स्पर्धा हरला पण आता रसिकांना जिंकून गेला…

एमपीसी न्यूज – कट्यार काळजात फेम युवा गायक महेश काळे यांची बहारदार स्वरमैफल शनिवार, दहा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. ही महेश काळे यांची तळेगावमधील पहिलीच प्रस्तुती होती. तळेगावातील आभास मिडिया आणि एंटरटेन्मेंट या इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मैफिलीच्या निमित्ताने महेशने तळेगावात लहानपणी एकदा श्रीरंग कलानिकेतनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संगीत स्पर्धेसाठी आलो होतो अशी आठवण सांगितली. त्यानंतर आज पहिल्यांदाच येथे आलो आहे असे सांगितले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तेव्हा मिश्किल स्वरात महेश पुढे म्हणाला की, पण तेव्हा मी स्पर्धा जिंकू शकलो नाही. कदाचित परीक्षकांना तेव्हा माझे गाणे पसंत पडले नसेल.  
 

पण आज या मैफिलीच्या निमित्ताने जमलेल्या तळेगावकर रसिकांना मात्र महेशने आपल्या सुरांनी जिंकून घेतले. ही मैफल ऐकण्यासाठी फक्त तळेगावच नव्हे तर खास पुणे, पिंपरी, चिंचवड, लोणावळ्यापासून रसिक उपस्थित होते.   

"mahesh

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.