Marunji : दारु कंपनीची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दारु कंपनीचा (Marunji) मालक असल्याचे सांगत कंपनीची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने एकाची 15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 रोजी मारुंजी येथे घडला.

याप्रकरणी दत्तू सोमनाथ गवळी (वय 53 रा. मारुंजी) यांनी शुक्रवारी (दि.23) फिर्याद दिली असून करुन कौरा (रा.पंजाब), रिमझिम मुखर्जी, अजिंक्य अनिल कासारे (वय 28 रा. नांदेड सिटी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad : बेपत्ता व्यवसायिकाचा लागला शोध; विवाहबाह्य संबंधामुळे दोन मुलांनी केली वडिलांची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना (Marunji) आरोपी हे काया ब्लेडर अन्ड डिस्टीलेर प्रा.लि. या दारु बनवणाऱ्या कंपनीचे मालक असून पुणे जिल्ह्यासाठी डिलरशिप देतो असे सांगून विश्वास संपादन करून 15 लाख रुपये घेतले. मात्र, आतापर्यंत मालाची डिलिव्हरी दिली नाही की डिलरशिप दिली नाही तसेच भरलेले पैसे परत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.