Pawana River : पवना नदी संवाद यात्रेची उत्साहाने सुरूवात

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र शासन, जलबिरादरी व पवना नदीसाठी (Pawana River) काम करणार्‍या इतर सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर ‘चला जाणूया नदीला’ अभियान राबवले जात आहे. ज्यात महाराष्ट्रातील जवळपास 109 नद्यांवर नदी संवाद यात्रांचे आयोजन केले जात आहे. त्यांपैकीच एक असणाऱ्या पवना नदीवर 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता सांगवीतील पवना व मुळा संगम क्षेत्राजवळील संगमेश्वर मंदिराजवळ नावेतून पाण्याचे पुजन करुन नारळ अर्पण करुन या यात्रेचे उद्घाटन केले गेले.

सदर यात्रेमध्ये विविध विद्याशाखांत शिक्षण घेणारे 30 विद्यार्थी सातही दिवस पूर्णवेळ पायी चालणार आहेत. या पदयात्रेचा मूळ उद्देश नदी, शासन व समाज यांमध्ये संवाद घडवून आणणे हा असून नदीची सद्यस्थिती व सातत्याने पूर व दुष्काळ यांची वाढत असलेल्या वारंवारितेला समजून घेणे त्यासोबतच त्यांच्या निराकरणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्यांचा अभ्यास करणे हाही आहे.

नदीला भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करणार्‍या युवकांचा एक गट तयार व्हावा, या हेतूने अभ्यास सत्रांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. नवी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर स्मशानभूमी घाट येथे जलबिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष  नरेंद्र चुघ तसेच रोटरी कल्ब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक प्रदीप वाल्हेकर व अध्यक्ष गणेश बोरा यांनी व पिंपरी चिचवड जलसंपदा विभागातील अधिक्षक अभियंता जगताप, कार्यकारी अभियंता विजय पाटील व कार्यकारी अभियंता  राजेंद्र धोडपकर उपस्थित होते.

इकोलॉजिकल सोसायटी, पुणेचे विश्वस्त डॉ. गुरूदास नूलकर यांचे अभ्यास सत्र पार पडले. यात (Pawana River)
त्यांनी नदीची परिसंस्था व त्याचा आपल्या जीवनाशी असणारा थेट संबंध यावर मार्गदर्शन केले. यात्रेच्या पुढील प्रवासादरम्यान नटसम्राट निळू फुले सभागृहात सामाजिक कार्यकर्ते राजू साळवे यांनी पवना नदीवर केलेल्या कामांचे अनुभव कथन केले. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्रही पार पडले.

Pawana River

Maval : रासेयो शिबिरात जागवले छत्रपती संभाजी महाराजांचे स्फुल्लिंग

ही पदयात्रा पुढील सात दिवसांमध्ये पवना नदीकाठच्या गावांमध्ये प्रवास करत नदीची सद्यस्थितीत तसेच नदी व लोकांचा सहसंबंध लोकसंवादातून जाणून घेईल. तरी सदरील पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (यात्रा सहभागासाठी संपर्क – 91 75881 92382, गिरिष पाटील राष्ट्रीय युवा समन्वयक जलबिरादरी, व
8975151617 रसिका वाल्हेकर समन्वयक पवना नदी संवाद यात्रा)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.