Maval : रासेयो शिबिरात जागवले छत्रपती संभाजी महाराजांचे स्फुल्लिंग

एमपीसी न्यूज : कल्हाट गाव हे ऐतिहासिक (Maval) गाव आहे. येथील तरुणाईत संभाजी महाराजांविषयी प्रेम आहे. योग्य दिशेने राष्ट्रीय चारित्र्याच्या पिढ्या या गावात तयार होतील. आपल्या 32 वर्षांच्या आयुष्यात बालवयापासून संघर्ष वाट्याला येवूनही परिस्थितीसमोर गुडघे न टेकता तिच्या छाताडावर तांडव करणारा एक महान युगपुरुष म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयी राहील, असे मत इंद्रायणी महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केले. अंदर मावळातील कल्हाट येथे सुरू असलेल्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोराडे बोलत होते.

या प्रसंगी ह.भ.प. गोपीचंद महाराज कचरे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, माजी उपसरपंच बबन आगिवले पाटील, डाॅ. मधुकर देशमुख,निलेश गराडे, प्रा. सत्यजित खांडगे, पांडुरंग पोटे सर, माजी सरपंच जाचक, पप्पू पवार, बबन पवार, जावेद मुलानी, संदेश भेगडे, अमोल खैरे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दीप्ती पेठे, प्रा.डी.पी. काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना बोराडे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे आजच्या नव्या दमाच्या पिढीचे आदर्श असायला हवेत. निर्व्यसनीपणा, निष्कलंक चारित्र्य, कर्तृत्व व लोकसंग्रहाची कला ही त्यांच्याकडून शिकली पाहिजे. तत्कालिन सर्वात शक्तिशाली बादशहा औरंगजेबाशी तब्बल नऊ वर्षे संघर्ष करून स्वराज्य रक्षणाचे मोठे कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केले. असा विश्वास वाटतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे (Maval) प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव व उद्योजक नंदकुमार शेलार उपस्थित होते.

Talegaon Dabhade : डीपी रस्ता रुंदीकरणात कायम रहिवाशी असलेल्यांना बेघर करू नका

शेलार आपल्या मनोगतात म्हणाले, की छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना निष्ठेची, संघर्षाची प्रेरणा देत राहील. त्यातून विद्यार्थ्यांनी आयुष्यात श्रम, संघर्ष आणि जिद्दीच्या त्रिसूत्रीवर भर देत स्वतःचा विकास साधावा. कार्यक्रमाचा समारोप प्रा. सत्यजित खांडगे यांनी केला, तर सूत्रसंचालन प्रा. डी. पी. काकडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.