Maval : विजेच्या खांबाला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकी चालवून दुचाकीने विजेच्या खांबाला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 25 मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे (Talegaon) येथे झाला. 
नरेश चंचल शर्मा (वय 44 रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत रमेश जाधव ( वय 29, रा. वराळे, ता. मावळ) यांनी शुक्रवारी (दि. 5) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Wakad : आयपीएल सामन्यावर बेटींग लावल्याप्रकरणी दहा जणांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश हा 25 मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरून जात होता. त्यावेळी नवलाख उंब्रे (Talegaon) बाजूकडून मंगरुळ बाजूकडे जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला दुचाकी धडकली. यात गंभीर जखमी होऊन नरेश याचा मृत्यू झाला तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.